Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

संक्रांतीचे वाण-

ती कृष्ण-अर्जून,कर्ण आणि सोन्याची टेकडी यांची गोष्ट सगळ्यांनी वाचली असेल,असणारच फॉरवर्डींगच्या या युगात कोणीच कोरड राहू शकत नाही या मेसेजींग पासून.                आपण जे पुर्वापार करत आलोय पण आता विसरुन गेलोय तेच तर या मेसेजमध्ये सांगितले आहे.                आज रथसप्तमी, सगळ्यांकडचे हळदीकुंकू कार्यक्रम संपले असतील. संक्रांतील वाण लुटण्याची आपली परंपरा, आपल्या हातांनी उचलून घेण्याची परंपरा सोडून आपण प्रत्येकीला अगदी पदर हातात धरुन देण्याची परंपरा स्विकारली आणि आता हे मेसेज फॉरवर्ड करुन

फेसबुक

पुर्वी असे बोलले जायचे.... वऱ्हाडातल्या एखाद्या शहरात एखादा खडा भिरकावला तर तो वकीलाच्या डोक्यावर पडतो. लाहोरमध्ये कुठेही नजर फिरवली तर ती एखाद्या सुंदर ललनेच्या मुखावर पडते. डोंबिवलीमध्ये जोशी अशी हाक मारली तर पाच पंचवीसजणं मागे वळून बघतात. कोणतेही बटण दाबले तरी मत कमळालाच जाते. त्याप्रमाणेच  इथे कुठे ही लाईक,बदाम आणि पुष्पगुच्छ भिरकावला तरी तो सुंदर स्त्रीच्या पोस्टवरतीच जावून पडतो.

नोटिफिकेशन्स

कपड्यात सुळसुळणारा ढेकुण चिरडून टाकल्याशिवाय चैन पडत नाही       तसेच फेसबुक-व्हॉट्सअपच्या नोटिफिकेशन्स वाचल्याशिवाय चैन पडत नाही.      असं म्हणतात चिरडलेल्या  ढेकणाच्या रक्तातून नवीन ढेकूण जन्म घेतात.       तशाच एकदा वाचलेल्या नोटीफिकेशन नवीन नोटिफिकेशन बघण्याच्या इच्छेला जन्म देतात.
या कोवळ्या उन्हाला बघ रातराणीचा सुवास आहे, तुझ्या केसात माळण्या बघ मोगरा आतूर आहे. नको सोडवू गुंता केशसंभार अफाट आहे, त्यात विसावण्याला बघ जीव हा आतूर आहे. असे कसे मन माझे आज हे फितूर आहे, बघ जीव माझा तुझ्या मागे फरार आहे. नको दाखवू विभ्रम असे रुप तुझे जिवघेणे आहे, बघ प्राण माझा त्याच्यासाठी कुडी सोडण्या तयार आहे.

लाजरी

असे स्वत:शी लाजणे बरे नव्हे अशा पापण्या झुकवणे बरे नव्हे, नको व्यक्त करु गुज तुझ्या मनीचे असे मुक्याने बोलणे बरे नव्हे.

मन

मन मोठ्ठच असतं तसं सगळ्यांचं पण त्यात सामावलेली माणसं जेवढी खुजी तेवढं ते लहान होत आक्रसत जातं.