या कोवळ्या उन्हाला
बघ रातराणीचा सुवास आहे,
तुझ्या केसात माळण्या
बघ मोगरा आतूर आहे.
नको सोडवू गुंता
केशसंभार अफाट आहे,
त्यात विसावण्याला
बघ जीव हा आतूर आहे.
असे कसे मन माझे
आज हे फितूर आहे,
बघ जीव माझा तुझ्या
मागे फरार आहे.
नको दाखवू विभ्रम असे
रुप तुझे जिवघेणे आहे,
बघ प्राण माझा त्याच्यासाठी
कुडी सोडण्या तयार आहे.
Comments
Post a Comment