Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

अटळ प्रवास

आपले वय म्हातारपणाकडे झुकू लागलेय, हे समजून का घेत नसतील लोक की, सगळं कळत असत माणसांना पण हव्यास सुटत नसतो.    काही गोष्टी वयानुसार दुर्मिळ होत जातात आणि ओढ वाढतच जाते. अंतिम सत्याकडे जाताना अडखळायची ही स्टेशन्स आहे.    काही गाडीत बसून राहतात, खिडकीतून बाहेरचे निरिक्षण करत. तर काही पाय मोकळे करायला प्रत्येक स्टेशनवर उतरतात.    काहींना भुक भागवायची असते,काहींना तहान तर काहींना मोकळे व्हायचे असते.    प्रवास करावाच लागतो किती ही नाकारले तरी.    अगदी आपल्या रेल्वे सारखाच, स्टेशन घेत घेत, साइडिंगला वाट बघत वाट बघत एकाकी पणे पुढे जाण्याचा,  सिग्नल मिळण्याची वाट बघत.

श्रीकृष्ण- आपल्या आतमधलि

महाभारतीय युद्ध संपल्यावर, श्रीकृष्णाने अर्जुनाला रथातून पायउतार होण्यास सांगितले,अर्जून रथातून खाली उतरुन दूर गेल्यावर खाली उतरल्यावर श्रीकृष्ण रथातून खाली उतरले,त्याक्षणी अग्नीने रथाला आपल्या कवेत घेतले.रथ क्षणभरात जळून भस्मसात झाला.      अर्जूनाने श्रीकृष्णाला यामागचे रहस्य विचारले,श्रीकृष्णांने सांगितले, शत्रुपक्षातील अथिरथी,महारथींनी तुझा वध करण्यासाठी तुझ्यावर अस्त्रांचा मारा केला पण जोपर्यंत मी रथावर आरुढ होतो तो पर्यंत ती अस्त्र रथाला स्पर्श करु शकत नव्हती,ती रथाभोवतीच फिरत राहीले मी रथ सोडताच ती त्यांच्यामुळे रथ जळून नष्ट झाला.      जो पर्यंत विवेकरुपी श्रीकृष्ण आपल्या मनरुपी अश्वांचा लगाम धारण करुन असतो तो पर्यंतच आपला रथ योग्य प्रकारे मार्गक्रमण करत असतो. विवेकाने मनाचे लगाम सोडताक्षणी राग,लोभ,मद,मत्सर,अहंकार यासारखी अदृष्य अस्त्र आपल्या जीवनाचा रथ चुकीच्या दिशेला धावून भस्मसात होतो.      कायम जमिनीवर पाय असणारा आदर्श धुरंधर, कलियुगातही फक्त आणि फक्त ज्याच्या पाऊलखुणांवरती चालून माणसं यशस्वी होतात त्या श्रेष्ठ राजकारणी श्रीकृष्णाला...

मी पुस्तक

शब्द माझ्या मनामधले तीने उचलून घेतले, आणि तीच्या भावनांनी मी नखशिखांत भिजले. अर्थ होता, स्वार्थ होता थोडासा परमार्थ होता,त पण तीच्या स्पर्शामध्ये अमृताचा भास होता. एक क्षणात रेखले त्याने कागदावरी अक्षरचित्र, आणि तीच्या चिंतनाने लाभले शंभर अर्थ. शब्दांची दुनिया निराळी थाटून मी बैसले, आणि तीच्या जवळीकेने मी कृतार्थ झाहले. आज झाला स्पर्श तीचा आणी मनात उत्सव सजला या पुस्तकी जीवनाला नवीन जन्म लाभला.

पाऊस आणि ती

सुख-दु:खाचा श्रावण सरवा हळूच येतो,हळूच जातो, तीच्या मोकळ्या केसांमधूनी गंधवेगळा पाऊस झरतो. फुलाफुलांचे गंध लेवून थंड रेशमी वारा येतो, तीच्या गुलाबी अधराचाही गंध अनोखा त्यात मिसळतो. आकाशी लोळ उसळतो धरणीकडे धावत सुटतो, तीच्या कोवळ्या स्पर्शामधूनी एक वेगळा झंकार उठतो. अगळे वेगळे रुप घेवून सृष्टीचा रंग बहरतो, तीच्या देखण्या रुपाने मग मनामनात रोमांच उठतो. सृष्टीचा हा अलवार सोहळा धारांच्या तालावर रंगतो, तीच्या भावूक नजरे मध्ये आपुले अपुरे स्वप्न शोधतो.

मैत्रीदिन