आपले वय म्हातारपणाकडे झुकू लागलेय, हे समजून का घेत नसतील लोक की, सगळं कळत असत माणसांना पण हव्यास सुटत नसतो.
काही गोष्टी वयानुसार दुर्मिळ होत जातात आणि ओढ वाढतच जाते. अंतिम सत्याकडे जाताना अडखळायची ही स्टेशन्स आहे.
काही गाडीत बसून राहतात, खिडकीतून बाहेरचे निरिक्षण करत. तर काही पाय मोकळे करायला प्रत्येक स्टेशनवर उतरतात.
काहींना भुक भागवायची असते,काहींना तहान तर काहींना मोकळे व्हायचे असते.
प्रवास करावाच लागतो किती ही नाकारले तरी.
अगदी आपल्या रेल्वे सारखाच, स्टेशन घेत घेत, साइडिंगला वाट बघत वाट बघत एकाकी पणे पुढे जाण्याचा, सिग्नल मिळण्याची वाट बघत.
Comments
Post a Comment