Skip to main content

श्रीकृष्ण- आपल्या आतमधलि

महाभारतीय युद्ध संपल्यावर, श्रीकृष्णाने अर्जुनाला रथातून पायउतार होण्यास सांगितले,अर्जून रथातून खाली उतरुन दूर गेल्यावर खाली उतरल्यावर श्रीकृष्ण रथातून खाली उतरले,त्याक्षणी अग्नीने रथाला आपल्या कवेत घेतले.रथ क्षणभरात जळून भस्मसात झाला.
     अर्जूनाने श्रीकृष्णाला यामागचे रहस्य विचारले,श्रीकृष्णांने सांगितले, शत्रुपक्षातील अथिरथी,महारथींनी तुझा वध करण्यासाठी तुझ्यावर अस्त्रांचा मारा केला पण जोपर्यंत मी रथावर आरुढ होतो तो पर्यंत ती अस्त्र रथाला स्पर्श करु शकत नव्हती,ती रथाभोवतीच फिरत राहीले मी रथ सोडताच ती त्यांच्यामुळे रथ जळून नष्ट झाला.
     जो पर्यंत विवेकरुपी श्रीकृष्ण आपल्या मनरुपी अश्वांचा लगाम धारण करुन असतो तो पर्यंतच आपला रथ योग्य प्रकारे मार्गक्रमण करत असतो. विवेकाने मनाचे लगाम सोडताक्षणी राग,लोभ,मद,मत्सर,अहंकार यासारखी अदृष्य अस्त्र आपल्या जीवनाचा रथ चुकीच्या दिशेला धावून भस्मसात होतो.
     कायम जमिनीवर पाय असणारा आदर्श धुरंधर, कलियुगातही फक्त आणि फक्त ज्याच्या पाऊलखुणांवरती चालून माणसं यशस्वी होतात त्या श्रेष्ठ राजकारणी श्रीकृष्णाला मनापासून प्रणाम.
     श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव,
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,
मुकुंद विष्णू भगवन नमस्ते!!!

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४