सुख-दु:खाचा श्रावण सरवा
हळूच येतो,हळूच जातो,
तीच्या मोकळ्या केसांमधूनी
गंधवेगळा पाऊस झरतो.
फुलाफुलांचे गंध लेवून
थंड रेशमी वारा येतो,
तीच्या गुलाबी अधराचाही
गंध अनोखा त्यात मिसळतो.
आकाशी लोळ उसळतो
धरणीकडे धावत सुटतो,
तीच्या कोवळ्या स्पर्शामधूनी
एक वेगळा झंकार उठतो.
अगळे वेगळे रुप घेवून
सृष्टीचा रंग बहरतो,
तीच्या देखण्या रुपाने मग
मनामनात रोमांच उठतो.
सृष्टीचा हा अलवार सोहळा
धारांच्या तालावर रंगतो,
तीच्या भावूक नजरे मध्ये
Comments
Post a Comment