शब्द माझ्या मनामधले
तीने उचलून घेतले,
आणि तीच्या भावनांनी
मी नखशिखांत भिजले.
अर्थ होता, स्वार्थ होता
थोडासा परमार्थ होता,त
पण तीच्या स्पर्शामध्ये
अमृताचा भास होता.
एक क्षणात रेखले त्याने
कागदावरी अक्षरचित्र,
आणि तीच्या चिंतनाने
लाभले शंभर अर्थ.
शब्दांची दुनिया निराळी
थाटून मी बैसले,
आणि तीच्या जवळीकेने
मी कृतार्थ झाहले.
आज झाला स्पर्श तीचा
आणी मनात उत्सव सजला
या पुस्तकी जीवनाला
नवीन जन्म लाभला.
Comments
Post a Comment