सहजच लिहीली कविता
सहजच शब्द आले ओठी
सहजच कवितेतून उमटले
मन भावनेचे मोती.
सहजच भरावे आभाळ
सहजच व्हावी कातरवेळ
सहजच ओठामधून उमलावी
शुभ्र बगळ्यांची माळ.
सहजच यावी तान
सहजच उठावी लकेर
सहजच अंतरंगात जमावी
आप्तांची स्वकीयांची मैफल.
सहजच फुल उमलावे
सहजच बाळ हसावे
सहजच दारी यावे
सुख समाधानाचे पाऊल.
सहजच सुख वेचावे
सहजच समाधान वाटावे
सहजच येता जाता द्यावे
थोडे आनंदाचे देणे.
Comments
Post a Comment