विशाखा अभ्यंकर आज्जी
काही माणसं असतात कोमल,नाजूक, सुगंधी, सुंदर, सर्वांना हवीहवीशी वाटणारी - प्राजक्ता सारखी. प्राजक्ताला देववृक्ष म्हणतात तशीच.
देव बघितलेला नसला तरी काही माणसं देवाचे गुण घेवून येतात. त्यांना जपावे लागते हळूवारपणे, न दुखावता आपल्या ओंजळीत, आठवणींच्या कप्प्यात
असाच एक देवतरु माझ्या बागेतही आहे. लांब राहूनही लयलूट करणारे आनंदाची,आशिर्वादाची.
सहवासातील प्रत्येकावर माणिकमोत्यांचा लयलूट करणारी, फक्त त्यांच्या सावलीशी एकरुप होता आले पाहीजे.
Comments
Post a Comment