नकोच आता प्रेम अनावर
नकोच आता वेडी राधा,
पैलतीरावर वाट पाहते
तुकोबाची निर्मल गाथा.
नकोच आता ओढ असोशी
नकोच आता स्वप्न कोवळे
पैलतीरावर वाट पाहते
दासांचे वैराग्य चिंतन.
नकोच आता खेळ आगळा
नकोच आता इमले रचणे,
पैलतीरावर वाट पाहते
नाथांचे ते स्निग्ध स्पंदन.
नकोच आता भाव अनामिक
नकोच आता रेशीमगाठी,
पैलतीरावर वाट पाहते
मुक्ताईचे मुक्त होणे.
नकोच आता वाट पाहणे
नकोच आता गुंतत जाणे,
पैलतीरावर वाट पाहते
ज्ञानेशाचे निघून जाणे.
Comments
Post a Comment