नाते तुझे नी माझे
अमृता सम मधुर,
शब्दाविना उलगडे
मनामनात भाव.
वाटे लुटून यावे
सारे तुझ्यावरी ते
तुझ्या समीप येवून
एकरुप व्हावे.
विरहाची वेदना ही
होते असह्य आता,
आभाळ होवून आता
तुजला मिठीत घ्यावे.
हे शब्दही निमाले
भाव अव्यक्त राहे,
तुझ्याविनाच आता
अंता समिप जावे.
Comments
Post a Comment