गुलाबी तुझ्या ओठांवरले
अक्षर होवून उमटावे ,
आणी नाजूक खळीमधले
अमृत मीच व्हावे.
यौवनाचा बहर सारा
उसळून येई असा,
भ्रमर होवून बागेमधला
मकरंद प्राशून घ्यावे.
भाळावरची बट सुरेख
अनोळखी ती अक्षरे,
वाचता वाचता त्यांना
भाग्यामध्ये गोंदवावे.
अस्तित्वाच्या सुगंधाने
वातावरण भरुन जावे,
आणि एका क्षणासाठी
निसर्गाने स्तब्ध व्हावे.
असे असावे तू जवळी
असेच जग संपावे,
आयुष्याच्या कातरवेळी
जगण्याचे सोने व्हावे.
०९/०७/२०२२
Comments
Post a Comment