शब्दात न मावणारे
शब्द नवे देशील का ?
आनंदाचे पुष्प सारे
तुज हाती घेशील का ?
जोडली होती नाती
शब्दांनी नवी- जूनी
एक नाते शब्दवेडे
तू कधी स्मरशील का ?
शब्दांनी राखले कायम
इमान अर्थांशी,
नीति सोडल्या माणसांना
अर्थ खरा सांगशील का ?
शब्द सारे मुक झाले
वाचाळ मुखांपुढे
मुक शब्दांमागले अर्थ
तू तरी जपशील का ?
शब्द असतो अर्थ वेडा,
भावनांचा भुकेला
भावनांचा शब्द सेतू
तू सदा होशील का ?
----- अभय बापट
२४/०७/२०२२
Comments
Post a Comment