रुणझुण पैंजणांचा
नाद अंगणात,
पावसाची झाली
पहाट अंगणात.
मृग बरसला
धारा अंगणात,
फुलला सरींचा
पिसारा अंगणात.
मातीने धरला
फेर अंगणात,
सुगंधाचा उठला
कल्लोळ अंगणात.
जीवनाचे पहिले
पाऊल अंगणात,
सृजनाची नवी
ओळख अंगणात.
नशिबाची भरली
झोळी अंगणात,
सुखाची आली
सोयरी अंगणात.
१६/०७/२०२२
Comments
Post a Comment