पाखरांनी घेतली भरारी फार झाली.
माणसांनी घेतली उधारी फार झाली.
उसनी आहे उंची आकाश पाळण्याची
माणसांची स्वप्ने विषारी फार झाली.
पुर्वा पार जपले गेले माणसाचे माणूसपण
पुर्वीच्या काळात माणसे विचारी फार झाली.
शब्दा़ंचा अर्थच हरवला आहे आज काल
माणसांची मने विखारी फार झाली.
श्वापदांचे घर मनातच असते सदाचे
माणसांची वस्ती अत्याचारी फार झाली
नको गोंदवूस भाळावरती नाव कुणाचे
गर्दीतील माणसे अविचारी फार झाली.
सावधपणे एक आता देवाघरच्या हाका
नवीन अवतार होण्याची तयारी फार झाली.
-------- अभय बापट
०९/०८/२०२२
Comments
Post a Comment