भेटली अनंत नाती, माणूस भेटला नाही
कृष्ण भेटला पावलोपावली,राधा भेटली नाही.
सुख भेटले अनंतहस्ते,समाधान भेटले नाही
विद्या भेटली गुरुमुखातून, ज्ञान भेटले नाही.
सखे भेटले वळणावरती,साथ भेटली नाही
शब्द मिळाले अविरत इथे , प्रेम भेटले नाही.
जिथे तिथे चर्चा गोविंदांची,गोपाळ भेटला नाही
आरक्षणा धावतील सारे,रक्षक भेटला नाही.
भोगी भेटले आयुष्यामध्ये,योगी भेटला नाही
सत्ता भेटली इथे मुरारी,सावली भेटली नाही.
विश्वासाने चालत होतो,ध्येय भेटले नाही
सर्व मिळाले तुझे कान्हा,राधा भेटली नाही.
१९/०८/२०२२
Comments
Post a Comment