जगणं सुंदर आहे
रंगात रंगणं सुंदर आहे.
रंग कोवळे उन्हाचे
पावसात न्हाऊन आले
तिच्या केंसावरुन त्यांच
ओघळणं सुंदर आहे.
कशाला हवेत रंग
हातात फुलपाखरांचे
अंगावरती चांदण्याचं
खेळण सुंदर आहे.
नकोस करु घाई
रितं होण्याची
रंग भरलं रुप तीचं
न्याहाळणं सुंदर आहे.
इंद्रधनुष्याची काया घेवून
ती समोर आली
इंद्रधनुष्याला सामोरं
जाणं सुंदर आहे.
०१/१०/२०२२
Comments
Post a Comment