या मनापासून दूर वेडे
फक्त तुझे गाव आहे,
आठवणीत माझ्या सदाचे
फक्त तुझेच नाव आहे.
चांदण्यांचे फुल तेव्हा
नभांतरी जे उमलले,
अजून माझ्या आसमंती
केवड्याचा सुवास आहे.
सोनसळी यौवनांचा
देहावरती भार आहे,
अजूनही तूच वेडी
सौंदर्याचे परिमाण आहे.
मौनामधूनी मार्दवाची
माया जी प्रगटते,
तीच माझ्या अंतरंगी
जीवाचा आधार आहे.
तूच वेडे स्वप्न माझे
तूच अंतरीची ओढ आहे,
माझ्या मनाचा तगमगीला
तूच शेवटचा उपाय आहे.
------- अभय बापट
१६/१०/२०२२
Comments
Post a Comment