खूपजणांना भेटायचे राहून गेले
खूपजणांशी बोलायचे राहून गेले.
डोळे व्याकुळ झाले एका दर्शनाला
खूपजणांकडे बघायचे राहून गेले.
आपुलकीची ओढ असते मनामध्ये
खूपजणांना शोधायचे राहून गेले.
एवढ्याश्या वेळात सगळे कसे जमायचे
खूपजणांशी जोडायचे राहून गेले.
परत येतील का हे आनंदाचे क्षण
कधी भेटायचे ते ठरवायचे राहून गेले.
११/१०/२०२२
Comments
Post a Comment