तुझे शब्द काल भलतेच ओथंबलेले
कदाचित काल पाऊस बरसून गेला.
माझ्या ही मनाला आलेली तरारी
एक शब्द माझ्याही मनात रुजून गेला.
नको दिवास्वप्ने पुन्हा ती नव्याने
तुझ्या चांदण्याने उन्हाळा निमून गेला.
तुझा भाव वेडा वेल्हाळ थोडा
मनावर पुन्हा कोडे गोंदवून गेला.
नको गुढगर्भी ते गुज अंतरीचे
जो भाव कधीचाच सुकून गेला.
---- अभय बापट
०८/०१/२०२३
Comments
Post a Comment