आमचं नशीब तिच्या होकारात अडलेलं
स्वप्नही चांदण्यासाठी रात्रभर जागलेलं.
नसेल नशीबी कदाचित अत्तराचा फाया
सुगंधाचे वरदान मध्येच वाऱ्यामुळे थांबलेलं.
डोळ्यांमधले पाणी ओसंडून वाहते तरी
मन अजूनही तीच्या वाटेवर तहानलेलं.
कशाला हवेत हे एका दिवसाचे सोहळे
पुर्ण आयुष्यच तीच्या प्रेमात गुंतलेलं.
माणसं येतात आणि जातात आयुष्यात
निसर्गाचे चक्र कुठे कोणाला चुकलेलं.
-----अभय बापट
०९/०२/२०२३
Comments
Post a Comment