एकदा अशीच प्रश्न ऊत्तरांची
लागली होती स्पर्धा,
कधी पुढे कधी मागे
मारत होते उड्या.
कोणीतरी मध्येच येवून
प्रश्नाला पाठबळ देई
ऊत्तर काही क्षण त्याच्या पुढे
निरुत्तर होवून जाई.
प्रश्न आणि उत्तर यांच्या मध्ये
दुही उभी राहीली
लोकांनीही त्यांच्यासाठी
एकी तोडून टाकली.
प्रश्न उत्तरांची स्पर्धा ही
विचारांची स्पर्धा राहीली नाही
माणसांमध्यल्या हेवादाव्यांनी मग
नात्यांचीही पर्वा केली नाही.
प्रश्नावरती प्रश्न आणि
उत्तराला दुरुत्तर
स्पर्धा कधीच थांबणार नाही
जोपर्यंत आपण समजूतदार होणार नाही.
Comments
Post a Comment