चित्रांचीही भाषा असते
शब्दांना असतात रंग,
आपुलकी असेल मैत्रीमध्ये
तरच उठतात मनात तरंग.
शब्द आणि चित्र यांचे
महत्व तेव्हा उरत नाही,
जिव्हाळ्याने दोन जीव
अबोलपणे बोलतात काही.
मौनांची भाषांतरे
मनामनाला उमजतात,
एकमेकांचे महत्व जेव्हा
न बोलता मान्य करतात.
Comments
Post a Comment