जशी देवाची भक्ती आपण बारा महिने करत असलो तरी वर्षातील एक दिवस निवडून आपण त्या भक्तिचा उत्सव साजरा करतो.
त्याचप्रमाणे
वेडेपणाचा वसा आपण कायमस्वरूपी स्विकारला असला तरी त्याचा उत्सवही एक दिवस साजरा करतो.
वेडेपणाचे गंध अविरत उगाळून त्याचा लेप आपल्यावरच करुन आपली निर्मळ वृत्ती आपण झाकून टाकतो.
या वेडेपणाच्या जागतिक उत्सवाला हार्दिक शुभेच्छा, हा उत्सव अनंत काळापर्यंत साजरा करण्याची शक्ती आपल्याला लाभो हीच प्रार्थना.
Comments
Post a Comment