पानाची साथ सुटते झाडापासून. वेदना तर होत असतीलच दोघांनाही. पण झाडं स्थिर राहतं भक्कमपणे पाय रोवून.
पान मात्र भिरभिरते,वाऱ्यावरती, मायेच्या उबेच्या आशेने धरतीकडे धावते.काहींच्या नशीबी असते ही उब, काहींच्या नशीबी मात्र जळून जाणे आठवणींच्या वैशाखवणव्यात.
माणसांनी झाडा सारखं व्हावे, स्थिर,आत्ममग्न,त्याला सृजनाची साथ असते हे खरेच, म्हणूनच ते परिपुर्ण असते,आप्तांच्या संगतीत.
पानं,कळ्या,फुलं,फळं मिरवीत,आनंदाने डोलत.
Comments
Post a Comment