आप्पा आणि बाप्पा जून्या आठवणीत रमले होते. त्यांनी लिहीलेली, संकलित केलेली जूनी पुस्तकं चाळत उजळणी चालू होती.
बाप्पा एकदम आप्पाला म्हणाले," चल,कुछ तुफानी करते है, कलयुग का नया महाभारत रचते है".
आप्पा म्हणाले बाप्पांना," या वेळी मात्र मी एकटा सलग गोष्ट सांगणार नाही,पृथ्वीवरच्या सामन्य माणसांनाही संधी देवूया,गोष्टी रचायची आणि गोष्टी पुढे ढकलण्याची ही".
त्यावर बाप्पा ही म्हणाला," असे असेल तर लिहीलेलं,वाचलेलं आणि फॉरवर्ड केलेली गोष्ट,तीचा मतितार्थ समजून घेण्याची अट ही कोणावरच नसावी".
योजना ठरली आणि जन्म झाला,कलियुगाच्या महाभारताचा अर्थात व्हॉट्सअपचा.
दोघांचे ठरले सर्वात जास्त मतितार्थ न समजता केले जाणारे, परस्पर विरोधी अर्थ असणारे दोन मेसेज शोधायचे आणि नंतर माणसांना कायमचे यात गुंतवून ठेवायचे. अट फक्त एकच, " मेसेजेचा ओघ थांबता कमा नये, जेव्हा तो थांबेल तेव्हा हे व्हॉट्सअपसुद्धा बंद होईल".
एका मेसेजबद्दल आप्पांनी बाप्पांना सांगितले, जो मेसेज जवळजवळ प्रत्येकाने एकदातरी पुढे ढकलला होता,तो मेसेज होता, नोकिया मोबाईल आणि कॉडॅक कंपनी, या दोन कंपन्यांनी बदलणाऱ्या परिस्थितीशी, लोकांच्या बदलणाऱ्या आवडीची दखल घेतली नाही म्हणून त्यांचा अंत झाला" अशी त्या कंपन्यांची टिंगल केली जाते.
आता पाळी होती बाप्पांची,त्यांनी जो मेसेज वाचून दाखवला तो मेसेजही जवळपास प्रत्येकाने शेअर केला.तो मेसेज होता कोलगेट कंपनीबद्दल," कोलगेट कंपनीनी लोकांची आवड, त्यांची बदलती रुची योग्य वेळी ओळखून घेवून आपल्या उत्पादनात बदल केले. आपल्या भूमिकेवर ठाम नसल्याबद्दल लोकं त्या कंपनीची टिंगल करणारा मेसेज होता तो.
दोन्ही मेसेज उद्योगांनी कसे वागावे याचे अनुभव देणारे होते, दोन्हीची शिकवण सेमच होती पण फक्त समजून न घेता दोन्ही कंपन्यांची टिंगल करण्यातच धन्यता मानणारे होते.
बाप्पांनी आणि आप्पांनी एकमेकांकडे बघून स्मित हास्य केले, शयनकक्षात जाण्यापूर्वी लोकांना ढकलाढकली बंद झाली तर व्हॉट्सअप बंद झाले तर माणसं किती हवालदिल होवू शकतात ते दाखवण्यासाठी व्हॉट्सअप काही क्षण बंद करुन युगानुयुगे निद्रिस्त होण्यासाठी निघून गेले.
©चैतन्य सागर (अभय बापट)
Comments
Post a Comment