नको वाटे संध्याकाळ
शब्दांचेच वाटे ओझे,
दिसभर पेरलेले
भुतं होवून मनी नाचे.
नको वाटे संध्याकाळ
मौनाची ती कातळवेळ,
आपुलकीच्या उत्साहाला
काळोखचे ग्रहण.
नको वाटे संध्याकाळ
मावळतीचे रंग दावी,
मनीच्या डोहावर
व्याकुळतेची शेवाळ येई.
नको वाटे संध्याकाळ
रातीची ती पाऊलवाट,
नित्य नव्याने जायचे
त्या अनोळखी जंगलात.
Comments
Post a Comment