वठले झाड त्याला
वाढणे म्हणू नये,
सुटले हात त्याला
साथ म्हणू नये.
कुंठला अभ्यास त्याला
ज्ञान म्हणू नये,
सुटला विवेक त्याला
विचार म्हणू नये.
तुटला ओलावा त्याला
माया म्हणू नये,
ढळला तोल त्याला
आचार म्हणू नये.
आपुलकीची साथ त्याला
आभास म्हणू नये,
रुक्षतेचा भास त्याला
खास म्हणू नये.
सुटले प्रयत्न त्याला
प्रगती म्हणू नये.
तुटला विश्वास त्याला
भक्ती म्हणू नये.
Comments
Post a Comment