१)
पिवळा गोजिरा रंग लेवूनी
सजली दुर्गेची रुपे साजिरी,
सुर्याचे तप्त किरण ओढूनी
नजरेमधूनी उजळे समई.
शांततेची मुर्त जणू ती
साऱ्या जगताची माऊली
नवरात्रीतील नऊ दिसांची
चराचरासाठी ती साऊली.
२)
पिवळीच ती पाकोळी ती
धरतीवरती अवतरली,
लेवून सोनसळी किरणे
फुलपाखरे भिरभिरली.
Comments
Post a Comment