असे म्हणतात की, "रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता".
हे तंतोतंत खरे वाटावे अशी परिस्थिती आजूबाजूला दिसतेय, गेल्या काही वर्षात पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जचे प्रमाण काही ग्रॅम्स पासून काही हजार किलोपर्यंत पोहोचले आहे.
नेहमीसारखे तरुणांना व्यसनाधीन करण्याचे पाकिस्तानचे षडयंत्र म्हणून दुसरीकडे बोट दाखवून हे थांबणार नाही आहे.
पैसेवाल्यांची पोरं टाईमपास आणि बापकमाईचा माज म्हणून बाई,बाटली, ड्रग्ज याच्याकडे बघतो.
गरीब लोकं अभावग्रस्तीच्या जीवनापासून दूर जाण्यासाठी या व्यसनांना जवळ करतो.
आणि मध्यमवर्गीय हा मधोमध लोंबकाळणारा वर्ग वैफल्यग्रस्त होतोय, तो या गोष्टींकडे थ्रिल म्हणून बघतोय. मध्यमवर्गीय तरुणांमध्ये हुक्काची वाढणारी फॅशन हेच दर्शवतेय. मी व्यसनाच्या आहारी जाणारचं नाही हा खोटा अहंकार त्यांना याचा आहारी लोटतोय. यांच्या पालकांना वरच्या वर्गात जाण्याची लागलेली ओढ यांना मुलांपासून दूर ठेवतेय.
रोम जळतेय आणि सरतेशेवटी याची सर्वात जास्त झळ लागणार आहे तो समाज कोणाची तरी खाजवण्यात मग्न आहे.
अभय
Comments
Post a Comment