कधी फुलांचा रंग
कधी ताऱ्याचे तेज,
कधी गालावरचे गुलाब
तुझ्या शब्दी.
कधी कस्तुरीचा गंध
कधी वारा बेबंध,
कधी वादळी प्रपात
तुझ्या शब्दी
कधी माऊलीचे प्रेम
कधी सावलीचा आधार,
कधी सत्कार्माचा विचार
तुझ्या शब्दी.
कधी तेजाची आरास
कधी संस्कारांचा ध्यास
कधी माणुसकीवर विश्वास
तुझ्या शब्दी.
कधी गहन विचार
कधी खळखळणारी धार
कधी आयुष्याचे सार
तुझ्या शब्दी.
------- अभय बापट
०४/१२/२०२२
Comments
Post a Comment