ओठ जेव्हा ओठांना भेटतात तेव्हा काय होते
आयुष्याची फुले उमलतात तेव्हा काय होते.
सागराची निळाई दुरवरुन भुलवत असते
अथांगात स्वप्न सामावतात तेव्हा काय होते.
अंतरंगातला ओलावा नव्याला जन्म देतो
देहावरती ऋतू पालटतात तेव्हा काय होते.
शब्दांशिवायही गुज उमटते अंतरंगात
दोन जीव एकरुप होतात तेव्हा काय होते.
सगळेच भाव कुठे व्यक्त करता येतात
गात्रामधून कविता स्फुरतात तेव्हा काय होते.
------ अभय बापट
२९/१२/२०२२
Comments
Post a Comment