अंतरामध्ये सदाचा
मधुमास पाहीजे,
सोबतीला तुझा सदा
सहवास पाहीजे.
मास बदलतात
नेमाने वर्षामधले
तू आहेस सोबतीला
विश्वास पाहीजे.
वसंत ऋतू देत असतो
भरभरुन फुले,
आपल्या नात्यामध्ये तो
सुवास पाहीजे.
केला आहे करार हा
अनंत काळाचा,
अंतरात्म्याला भेटण्याचा
प्रवास पाहीजे.
------- अभय बापट.
११/०३/२०२३
Comments
Post a Comment