सावरतो रंग श्रीहरीचा माणसांना
स्वमग्न माणसाला काय त्याचे.
आजकाल गाय उपाशी येते घरी
भुकेल्या वासराला काय त्याचे.
खळ्यातच रुजून येते धान्य सारे
वाट चुकल्या निसर्गाला काय त्याचे.
उपाशी झोपतात गरीब कच्चीबच्ची
समृद्धीच्या दलालाला काय त्याचे.
मोकळा पसा काय वाटणार भुकेला
पुस्तकी उपदेशाला काय त्याचे.
----- अभय बापट
१०/०३/२०२३
Comments
Post a Comment