माझ्या जन्माच्या प्राक्तनाला
असे नको रे बांधूस,
तुमच्या इवल्याशा सुखासाठी
घरटे नको तोडूस.
घरटे तुझे माझे
राहो वसुंधरेच्या खांद्यावर,
तुझ्या सुखाचे चांदणे
पडो माझ्या पिल्लांवर.
फार नाही मागणे
नको डावलू निसर्गाला,
तोच देतेसे दाणा
तुझ्या माझ्या भुकेला.
तुझ्या बाळांची चिऊताई
होवून मी राहीन,
त्यांच्या बाळलीला पाहताना
पिलांना दाणा भरवीन.
चार दाणे भुकेसाठी
आणि पाण्याची खापरी,
कर विचार माणसा
तुला म्हणतात विचारी.
--- अभय बापट
२१/०३/२०२३
Comments
Post a Comment