नेहमीच काही नवे लिहावे सुचल्यानंतर
नेहमीच कसे नवे सुचावे तू नसल्यानंतर,
काही भावना, काही वेदना अक्षय असती
नेहमीच कसे मन मारावे तू दिसल्यानंतर.
पुन्हा पुन्हा घोळत राहतात शब्द वेंधळे
कसे रुसावे आयुष्यावर तू, स्मरल्यानंतर.
नजर,स्मित आणि तुझ्या अदांवर
सांग कितीदा किती लिहावे तू भेटल्यानंतर.
तुझ्या रंगात रंगून गेले आयुष्य सारे
सांग कसे ते रंग उतरावे तू गेल्यानंतर.
प्रथमच लिहीली अशी कविता तुझ्यासाठी
मिळेल का अभय सांग तू, वाचल्यानंतर.
---- अभय बापट
१२/०५/२०२३
Comments
Post a Comment