प्रतिभावंत जनांनो जमू इथेच आता
झाडावरच्या कळ्यांनो उमलू इथेच आता.
साहित्य सुमनांचे वेचू सुगंध थोडे
आपले बोल बोबडे बोलू इथेच आता.
नक्षत्रांची पायवाट उजळली त्यांनीच आहे
त्या वाटेवरुन आपणही चालू इथेच आता.
कल्पकता आणि कलांचा घेवून वारसा हा
आनंद कणाकणांनी उधळू इथेच आता.
ते कण अमृताचे देवून ज्ञानवंत गेले
ते क्षण भाग्यवंत वेचू इथेच आता.
---अभय बापट
२४/०५/२०२३
Comments
Post a Comment