उंची गाठण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न केले
पायच माझे त्यांनी तेव्हा छाटून टाकले.
नव्हते स्वप्न माझेही कोणतेही जगावेगळे
जातीत जगाला त्यांनी तेव्हा वाटून टाकले.
पोटासाठी घेतली मी तरीही भरारी वगैरे
राशीतले दाणे त्यांनी तेव्हा झाकून टाकले.
ठेवली होती थोडी हिरवळ आठवणींची
आठवणीने त्यांनी तेव्हा पाणी तोडून टाकले.
साधे सोपे नाही राहीले जगणे आता
आधीच त्यांनी तेव्हा कळीला खुडून टाकले.
--- अभय बापट
२४/०५/२०२३
Comments
Post a Comment