Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

गारुड

होते जरी सुगंधी परडी दररोज येथे तरीही फुटत नाही पाझर अत्तराचा. ---अभय बापट १५/०५/२०२४

बोभाटा

तुझ्या लाघवी गुणांचे चाहते हजार होते तरी एका अवगुणाचा गलबला फार झाला. ----अभय बापट १३/०५/२०१४

ग्रहण

ढगाआड गेला जरासा चंद्र माझा लागले कित्येक नजरांना ग्रहण फुकाचे. ----अभय बापट १३/०५/२०२४

तुझे रुप

माझ्या लाडक्या मैत्रीणीसाठी....  ...शमा.... तुझे रुप घेवून प्राजक्त आला मोगऱ्याला लावला तू सुगंधी लळा. तुझ्या यौवनाने  उजळली दिशा ती तुझ्या बोलण्याने स्वरांना गायनी कळा. तुझ्या रुपातूनी घेवून रंग आकाशाने नेसली वस्त्रे नवी, तुझ्या केसातून उतरुन आली दामीनी जगाला भेटायाला. तुझ्यात रुपाने आली साक्षात अप्सरा येथे मदनाने घेतला रंग निळा सावळा. सोनसळी रंग लेवून आला सृष्टीला लाभला रंग कोवळा तुझ्या गंधाने असा कल्लोळ केला कस्तुरीच्या लागला कपाळी टिळा. तुझे गुण घेवून शब्द धावून आले, तुझे गीत गाणे सुगंधी सोहळा. ..अभय बापट *************** तुझे रुप घेवून प्राजक्त आला मोगऱ्याला लावला तू सुगंधी लळा. तुझ्या यौवनाने  उजळली दिशा ती तुझ्या बोलण्याने स्वरांना  गायनी कळा. तुझ्यात रुपाने आली अप्सरा येथे, मदनाने घेतला रंग  निळा सावळा. तुझ्या गंधाने असा  कल्लोळ केला कस्तुरीच्या नावाचा  ललाटी टिळा. तुझे गुण घेवून शब्द धावून आले, तुझे गीत गाणे सुखाचा सोहळा. अभय बापट २३/०४/२०२३

एकाकी

एकेक फांदी माझी मी दूर सारत गेलो एकाकी जगण्याचा मी सराव करत गेलो. आपुलकीचे ओल यावे मुळांतून जरासे श्वासाचे युद्ध मी क्षणाक्षणाला हरत गेलो. धरू कशी उभारी आयुष्या सांग आता मुळाकडून मी आतून सुकत गेलो. मला जराजरासे स्वप्नांचे वेड होते झोपेविना तसाच मी रात्री झुरत गेलो. गाईन कौतुक तुझे शायरीतून माझ्या शब्दांनी काळीज माझे मीच कुरतडत गेले. ----अभय बापट २५/०४/२०२४
कशाला एवढी वाट बघतेस वेळ टळून जाण्याची, वेळही तुझ्यासाठी ताटकळत उभा असतो. ---अभय बापट २०/०४/२०२४

रिक्त

सप्रेम द्या निरोप मी रिक्त होत आहे सोडून सारे सत्व मी भक्त होत आहे. उजेडाला मिरवून मी मोठे काय केले. काळोखात जाण्यास मी उद्युक्त होत आहे. मारीत बाता मोठ्या जगामध्ये फिरलो त्यांच्या शक्तीवर मी अनुरक्त होत आहे. घर मोठे पोकळ वासा असे सारे झाले आतून आतून आता मी अशक्त होत आहे. मोठ्या लोकांचे नाव मुखी काय झाले त्यांच्या विचारधारेपासून मी मुक्त होत आहे. अवघड प्रश्न मांडले जगण्याने माझ्यापुढे सोडून सारी भिड आज मी व्यक्त होत आहे. ---अभय बापट २०/०४/२०२४

संहार

माणसाच्या दु:खाला नाही पारावार हल्ली बोकडाच्या मरणाला असतो का वार हल्ली. पावसाने मांडलाय अनाचार सारा माणसाने आरंभला आहे ऋतू संहार हल्ली. देव भेटतो देवळात म्हणतात सारे देवळाला ही कळतो व्यवहार हल्ली. मांडतात आजकाल मरणाचे सोहळे मनामध्ये जपून द्वेषाचा अंगार हल्ली. कसे जगावे माणसाने सांग आता उजेडाच्याच पायतळी अंधार हल्ली. देतोस रोज नव्याने सोनसळी स्पर्श तुझा पालवीनीच सोडला आहे धीर हल्ली. काय सांगू स्वप्नातल्या चांदण्या तुला तूच तू जगण्याचा आधार हल्ली. त्या सुगंधी भावनांना कोठून आणू फक्त तुझ्याच पाशी कस्तुरीचे कोठार हल्ली. -----अभय बापट १६/०४/२०२४

योग्य ठिकाण

योग्य ठिकाणी असले तर १० वॅटच्या बल्बला झीरोचा बल्ब म्हणून मान्यता मिळते आणि त्याला गुपचुप १० वॅट वीज कायदेशीररीत्या गिळंकृत करता येते. ----अभय बापट ०८/०४/२०२४

छोटसं स्वप्न

         आपण दोघांनी एकत्र जगलेल्या क्षणांना आणि एकत्र बघितलेल्या स्वप्नांना नाजूक सुगंधी फुलांसारखे ओंजळीत जपून ठेवलं होत मी.           वाटलं होतं कधीतरी तु स्वत:च्या ओंजळीत घेवून आपल्यावरती उधळशील ती, आपले भविष्य सुगंधी करण्यासाठी....           बसं एवढंच तर छोटंसं स्वप्न होतं माझं आपल्या बाबतीत....          आता तर ती फुलंही नाहीत, आठवणीतला तो सुगंध तेवढा शिल्लक उरला आहे, एखाद्या शापासारखा,कधीही उःशाप न मिळणारा. -----अभय बापट ०४/०४/२०२४