एकेक फांदी माझी मी दूर सारत गेलो
एकाकी जगण्याचा मी सराव करत गेलो.
आपुलकीचे ओल यावे मुळांतून जरासे
श्वासाचे युद्ध मी क्षणाक्षणाला हरत गेलो.
धरू कशी उभारी आयुष्या सांग आता
मुळाकडून मी आतून सुकत गेलो.
मला जराजरासे स्वप्नांचे वेड होते
झोपेविना तसाच मी रात्री झुरत गेलो.
गाईन कौतुक तुझे शायरीतून माझ्या
शब्दांनी काळीज माझे मीच कुरतडत गेले.
----अभय बापट
२५/०४/२०२४
Comments
Post a Comment