सप्रेम द्या निरोप मी रिक्त होत आहे
सोडून सारे सत्व मी भक्त होत आहे.
उजेडाला मिरवून मी मोठे काय केले.
काळोखात जाण्यास मी उद्युक्त होत आहे.
मारीत बाता मोठ्या जगामध्ये फिरलो
त्यांच्या शक्तीवर मी अनुरक्त होत आहे.
घर मोठे पोकळ वासा असे सारे झाले
आतून आतून आता मी अशक्त होत आहे.
मोठ्या लोकांचे नाव मुखी काय झाले
त्यांच्या विचारधारेपासून मी मुक्त होत आहे.
अवघड प्रश्न मांडले जगण्याने माझ्यापुढे
सोडून सारी भिड आज मी व्यक्त होत आहे.
---अभय बापट
२०/०४/२०२४
Comments
Post a Comment