आपण दोघांनी एकत्र जगलेल्या क्षणांना आणि एकत्र बघितलेल्या स्वप्नांना नाजूक सुगंधी फुलांसारखे ओंजळीत जपून ठेवलं होत मी.
वाटलं होतं कधीतरी तु स्वत:च्या ओंजळीत घेवून आपल्यावरती उधळशील ती,
आपले भविष्य सुगंधी करण्यासाठी....
बसं एवढंच तर छोटंसं स्वप्न होतं माझं आपल्या बाबतीत....
आता तर ती फुलंही नाहीत, आठवणीतला तो सुगंध तेवढा शिल्लक उरला आहे, एखाद्या शापासारखा,कधीही उःशाप न मिळणारा.
-----अभय बापट
०४/०४/२०२४
Comments
Post a Comment