माझ्या लाडक्या मैत्रीणीसाठी....
...शमा....
तुझे रुप घेवून
प्राजक्त आला
मोगऱ्याला लावला तू
सुगंधी लळा.
तुझ्या यौवनाने
उजळली दिशा ती
तुझ्या बोलण्याने
स्वरांना गायनी कळा.
तुझ्या रुपातूनी घेवून रंग
आकाशाने नेसली वस्त्रे नवी,
तुझ्या केसातून उतरुन आली
दामीनी जगाला भेटायाला.
तुझ्यात रुपाने आली
साक्षात अप्सरा येथे
मदनाने घेतला
रंग निळा सावळा.
सोनसळी रंग लेवून आला
सृष्टीला लाभला रंग कोवळा
तुझ्या गंधाने असा कल्लोळ केला
कस्तुरीच्या लागला कपाळी टिळा.
तुझे गुण घेवून
शब्द धावून आले,
तुझे गीत गाणे
सुगंधी सोहळा.
..अभय बापट
***************
तुझे रुप घेवून
प्राजक्त आला
मोगऱ्याला लावला तू
सुगंधी लळा.
तुझ्या यौवनाने
उजळली दिशा ती
तुझ्या बोलण्याने स्वरांना
गायनी कळा.
तुझ्यात रुपाने आली
अप्सरा येथे,
मदनाने घेतला रंग
निळा सावळा.
तुझ्या गंधाने असा
कल्लोळ केला
कस्तुरीच्या नावाचा
ललाटी टिळा.
तुझे गुण घेवून
शब्द धावून आले,
तुझे गीत गाणे
सुखाचा सोहळा.
अभय बापट
२३/०४/२०२३
Comments
Post a Comment