तू श्वास होऊन ये आठवणींच्या सोबतीला
गंध तुझा मोगऱ्याचा मनामध्ये जपलेला.
उब तू घेवून ये शब्दांमधली भावनांची
गारवा तू दिलेला डोईवर आहे थांबलेला
ही रात्र मंतरलेली दे हातामध्ये हात पुन्हा
तुझ्यासाठी स्वप्नांचा खेळ हा मांडलेला.
तुझ्या स्मितहास्य झरझर पावसासारखे
मनामध्ये नव्याने आशेचा अंकुर रुजलेला.
तुझ्या नजरेतील स्निग्धता आहे अजून जवळ
कालच्यासारखा आजही तो क्षण हृदयात जपलेला.
तुझ्या शिवाय अपूर्ण सारं, तुझ्यात आहे पूर्णत्व
म्हणूनच कोणी अजूनही त्या वळणार थांबलेला.
---- अभय बापट
०२/०५/२०२५
Comments
Post a Comment