नजर,स्मित आणि तुझ्या अदांवर
सांग मी किती लिहावे तू भेटल्यानंतर.
अमृतानी भरुन जाते खळी तुझी ती
सांग मी किती भूलावे तू हसल्यानंतर.
तुझी ओढ,तुझी आर्जवे,प्रीती तुझी ती
सांग मी कसे जगावे तू रुसल्यानंतर.
तुझ्या ओठांवर, तुझ्या बटांवर,
सांग मी किती लिहावे तू दिसल्यानंतर.
नाक चाफेकळी आणि मोत्यांची झळाळी
सांग मी कसे विसरावे तू गेल्यानंतर.
------ अभय बापट
Comments
Post a Comment