जेव्हा वाटते एकाकी
तेव्हा जावे सागराशी,
ओढून निळे लाघव
एकरुप व्हावे त्याच्याशी.
वर निळे आभाळ
खाली निळा समिंदर,
हळूच सोडून द्यावा
मनावरचा सारा भार.
लहरींच्या तालाशी
भिजू द्यावे अंतरंग,
काठावर येतायेता
निथळू द्यावे दु:खरंग.
वाऱ्याच्या स्पर्शातून
जन्मेल नवी उमेद,
सागराच्या विशालात
अर्पावे सारे खेद.
थेंबथेंब शांतता
ओघळू द्यावी मनात,
आणि मग परतावे
नव्या उमेदीने रणात.
----अभय बापट
१९/११/२०२५
Comments
Post a Comment