सारी शब्दांची निळाई
बासरी गुंजते कानात
किती भुलावे भुलावे
राधा जागते मनात.
किती लोभसवाणे गीत
किती सुरेल सुस्वर
मना मनाला लोभवतो
नटखट गोकुळचा चोर.
शब्द शब्द विरंगुळा
शब्द शब्द आधार
जणू आकाशाच्या गाभ्यातून
कृष्ण सगुण साकार.
----अभय बापट
२२/११/२०२५
Comments
Post a Comment