जसे चांदणे उन्हात
आणि कल्पवृक्ष वनात
काय उपयोग यांचा
जसे अमृत कानात.
जशी सावली फुफाट्यात
आणि मृगजळ रणात
काय उपयोग याचा
जशी निराशा मनात.
जसे स्वप्न मनात
स्पर्धा आपुल्यात
काय उपयोग यांचा
जसा द्वेष नात्यात.
जशी माऊली वृद्धधामात
आणि श्वान माजघरात
काय उपयोग याचा
जसा सुविचार पुस्तकात.
------अभय बापट
२८/११/२०२५
Comments
Post a Comment