२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चेंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी गेली कित्येक वर्ष म्हणजे १९८७ पासून विज्ञान दिन साजरा केला जात असला तरी सोशल मिडीयाच्या ताकदीने सर्वसामन्य लोक या दिवसाशी जोडली गेली. २८ फेब्रुवारी १९२८ याच दिवशी रमण यांंनी आपला शोध निबंध प्रसिद्ध केला. रामन इफेक्ट म्हणजे काय ? आपण दिवाळीत बघतो, घराबाहेर फटक्यातील बॉंबचा जोरदार स्फोट झाला की घरातील लहान मोठी भांडी कंप पावतात व त्यांचा नाद आवाज येतो,हा आवाजाचा परिणाम. पदार्थातील रेणू अत्यंत संवेदनशील असतात,प्रकाशाला कंपने असतात. वस्तूवर प्रकाश झोत पडला की तर वस्तूतील रेणू कंप पावते, क्षणानंतर ती कंपने आत घेतलेला प्रकाश परत बाहेर टाकतात,प्रकाशाचे विकिरीण करतात, निमिषार्धात होणाऱ्या या प्रकाशाच्या विकिरणांचे संशोधन रमण यांनी केले हाच रामण इफेक्ट. प्रत्येक पदार्थातून प्रकाशाचे विकिरण होण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. ...