माझ्या मराठीचा टिळा
मी लाविला कपाळी,
हिच्या शब्दांचा सुगंध
मी कौतुकाचा धनी.
इथे जे जे मिळाले त्या फक्त मराठीमुळेच. कोणालाही न बघता,न भेटता जे संचित जमा झाले ते देवी सरस्वतीच्या या दुधामुळेच. कधीकधी चुकीच्या संस्कारांमुळे हे अमृतही नासू पाहात होते पण त्या प्रत्येक क्षणी सरस्वतीची लेकच कान उपटायला आणि धपाटा घालायला पुढे सरसावली.
Comments
Post a Comment